आदिवासी मुलांचे पावसात आंदोलन
By Admin | Updated: January 2, 2015 00:59 IST2015-01-02T00:59:28+5:302015-01-02T00:59:28+5:30
वाशिम येथील वसतिगृहात विविध समस्या; मुलभूत सुविधांचा अभाव.

आदिवासी मुलांचे पावसात आंदोलन
वाशिम : येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहामध्ये अनेक समस्या आहेत. याबाबत संबधितांना वारंवार सांगण्यात आले. कोणीही गांभार्याने घेत नसल्याचे पाहून या वसतिगृहातील मुलांनी आज १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण आंदोलन सुरू केले. आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह (नविन) येथे अनेक समस्या आहेत. वस्तीगृहाची ईमारतीचे काम निकृष्ट झाल्याने विद्यार्थ्यांंंंना नेहमी त्रास सहन करावा लागतो. येथे मुलभूत सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांंंंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांनी वसतिगृहाची जागा बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून संबधितांकडे केली आहे. या मागणीकडे मात्र कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी पाण्यातच उपोषण सुरू केले. यामध्ये ताराचंद पवार, शंकर कदम, बबन माघाडे, विकास धोंगडे, रोशनसिंग डाबेराव, रामचंद्र गाढवे यांच्यासह अनेक विद्यार्थी होते.