शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ात १३0 डेंग्यूसदृश रूग्णांवर उपचार

By admin | Updated: November 8, 2014 00:53 IST

गत महिन्यात २५४२ रूग्णांची तपासणी : इचोरी, केनवड व कासोळा येथील चार डेंग्यू रूग्ण उपचारानंतर बरे.

नंदकिशोर नारे / बागरेचा - वाशिमसध्या संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यू या आजाराने धुमाकूळ घातला असून, रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. वाशिम जिल्हय़ातही डेंग्यूसदृश रुग्ण मोठय़ा संख्येत आढळून येत असून, जिल्हा प्रशासनाकडे चार रुग्ण डेंग्यू आजाराचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. उपचारानंतर सदरचे चारही रुग्ण मात्र डेंग्यू आजारातून बरे होऊन त्यांची प्रकृती सुधारली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयात असलेल्या नोंदीवरून दिसून येते.घर व घराच्या परिसरातील अस्वच्छता, साचलेले धरण पाण्याचे डबके भंगारात पडलेले टायर, पाणी साचलेले कूलर अशा विविध कारणांमुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू सारखा महाभयंकर आजार होण्याची शक्यता असते. डासांच्या चावल्यामुळे ताप येणे, डोके दुखणे, सर्दी होणे, अशक्तपणा येणे अशीही सुरुवातीची लक्षणे साधा डेंग्यू म्हणून ओळखली जातात. यानंतर त्या रुग्णांना वांती होणे, लघवीतून रक्त जाणे, अंगावर रक्ताचे डाग पडणे, हे डेग्युंची दुसरी पायरी होय, तर डेंग्यू शॉक सिंद्रोम म्हणजेच शंभर टक्के डेंग्यूचा आजार जडलेला रुग्ण होय. यामध्ये रुग्णांना श्‍वासोच्छवास होण्यास त्रास होतो व दम लागतो, ही तिसरी पायरी आहे. या परिस्थितीमध्ये पोहोचलेल्या रुग्णास फ्रेश प्लेटलेट देऊन उपचार केला जातो. ऑक्टोबर महिन्यात येथील जिल्हा सामान्य ग्रामीण रुग्णालयात सुमारे २५४२ तापाचे रुग्ण तपासण्यात आले. यातील चारशे रुग्णांची रक्ततपासणी करून डेंग्यूची तपासणी करण्यात आली. पैकी १३0 रुग्ण डेंग्यूसदृश आढळून आले. या सर्व रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यामुळे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. तर इचोरी, कासोळा व केनवड येथील ६७ रुग्णांची रक्त नमुना तपासणी करण्यात आली. यातील चार रुग्ण डेंग्यू आजार असल्याचे आढळून आले. उपचारानंतर सदरचे चारही रुग्ण बरे झाले, अशी माहितीही डॉ.सुरेखा मेंढे यांनी यावेळी दिली.