वाशिम जिल्हय़ात १३0 डेंग्यूसदृश रूग्णांवर उपचार

By Admin | Updated: November 8, 2014 00:53 IST2014-11-08T00:53:03+5:302014-11-08T00:53:03+5:30

गत महिन्यात २५४२ रूग्णांची तपासणी : इचोरी, केनवड व कासोळा येथील चार डेंग्यू रूग्ण उपचारानंतर बरे.

Treatment of 130 Dengue patients in Washim district | वाशिम जिल्हय़ात १३0 डेंग्यूसदृश रूग्णांवर उपचार

वाशिम जिल्हय़ात १३0 डेंग्यूसदृश रूग्णांवर उपचार

नंदकिशोर नारे / बागरेचा - वाशिम
सध्या संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी डेंग्यू या आजाराने धुमाकूळ घातला असून, रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. वाशिम जिल्हय़ातही डेंग्यूसदृश रुग्ण मोठय़ा संख्येत आढळून येत असून, जिल्हा प्रशासनाकडे चार रुग्ण डेंग्यू आजाराचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. उपचारानंतर सदरचे चारही रुग्ण मात्र डेंग्यू आजारातून बरे होऊन त्यांची प्रकृती सुधारली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयात असलेल्या नोंदीवरून दिसून येते.
घर व घराच्या परिसरातील अस्वच्छता, साचलेले धरण पाण्याचे डबके भंगारात पडलेले टायर, पाणी साचलेले कूलर अशा विविध कारणांमुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू सारखा महाभयंकर आजार होण्याची शक्यता असते. डासांच्या चावल्यामुळे ताप येणे, डोके दुखणे, सर्दी होणे, अशक्तपणा येणे अशीही सुरुवातीची लक्षणे साधा डेंग्यू म्हणून ओळखली जातात. यानंतर त्या रुग्णांना वांती होणे, लघवीतून रक्त जाणे, अंगावर रक्ताचे डाग पडणे, हे डेग्युंची दुसरी पायरी होय, तर डेंग्यू शॉक सिंद्रोम म्हणजेच शंभर टक्के डेंग्यूचा आजार जडलेला रुग्ण होय. यामध्ये रुग्णांना श्‍वासोच्छवास होण्यास त्रास होतो व दम लागतो, ही तिसरी पायरी आहे. या परिस्थितीमध्ये पोहोचलेल्या रुग्णास फ्रेश प्लेटलेट देऊन उपचार केला जातो. ऑक्टोबर महिन्यात येथील जिल्हा सामान्य ग्रामीण रुग्णालयात सुमारे २५४२ तापाचे रुग्ण तपासण्यात आले. यातील चारशे रुग्णांची रक्ततपासणी करून डेंग्यूची तपासणी करण्यात आली. पैकी १३0 रुग्ण डेंग्यूसदृश आढळून आले. या सर्व रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यामुळे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. तर इचोरी, कासोळा व केनवड येथील ६७ रुग्णांची रक्त नमुना तपासणी करण्यात आली. यातील चार रुग्ण डेंग्यू आजार असल्याचे आढळून आले. उपचारानंतर सदरचे चारही रुग्ण बरे झाले, अशी माहितीही डॉ.सुरेखा मेंढे यांनी यावेळी दिली.

Web Title: Treatment of 130 Dengue patients in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.