वाशिम जिल्ह्यात १0७१ क्षय रूग्णांवर उपचार
By Admin | Updated: March 24, 2015 00:41 IST2015-03-24T00:41:53+5:302015-03-24T00:41:53+5:30
वाशिम जिल्ह्यात २0४४ डॉटस उपचार केंद्राव्दारे क्षय रूग्णांची तपासणी.
_ns.jpg)
वाशिम जिल्ह्यात १0७१ क्षय रूग्णांवर उपचार
वाशिम :क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने पावले उचलली असून वेळोवेळी जनजागृती करून यावर आळा घालण्यात येत आहे. जिल्हयात २0४४ डॉटस प्रोव्हायडरव्दारे रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१४ पर्यंंत जिल्हयात १0७१ क्षयरोग्यांवर उपचार करण्यात आले असून यापैकी ८७२ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. जिल्हयात २00३ पासून २0४४ डॉटस उपचार केंद्रेसुरु करण्यात आली होती आजच्या स्थितीला २0४४ केंद्रात डॉटस पद्धतीव्दारे संबंधित कर्मचार्यांच्या देखरेखीत रुग्णांना औषधे घ्यायला लावली जातात. या २0४४ केंद्रात जिल्हा सामान्य रुग्णालय, सात ग्रामीण रुग्णालये, २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५३ आरोग्य उपकेंद्रे, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक व आरोग्यसेविका १७६८ व ४0 खासगी वैद्यकीय व्यावसायीक असे एकूण २0४४ डॉटस केंद्राचा समावेश आहे. नवीन रुग्णांवर डॉटसचा सहा महिनेपर्यंंत उपचार केला जातो. जुन्या रुग्णांवर आठ महिनेपर्यंंत उपचार केले जातात. एमडीआर टीबी असणार्या रुग्णांना प्रथम अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यायात सात दिवसापर्यंंत भरती करुन उपचार केले जातात नंतर २४ महिनेपर्यंंत डॉटसकेंद्रात उपचार केले जातात. सप्टेंबर २00९ पासून जिल्हयात डॉटस प्लस औषधोपचारास सुरूवात झाली आहे. जे रूग्ण डॉटस या औषध प्रचार प्रणालीमध्ये औषधोपचाराला दाद देत नाहीत अशा रूग्णांवर डॉटस प्लस उपचार औषधोपचार दिला जातो. २४ मार्च रोजी निघणार्या रॅलीला मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाला सुरूवात करतील. यात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन रूचेश जयवंशी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आर. एच. खत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, डॉ. एम.एस. बायस, डॉ. अनिल कावरखे, डॉ. जिरवणकर , आरोग्य विभागाची चमू यांच्यावतिने करण्यात आले आहे. तसेच क्षयरोग जनजागण मोहीम जिल्हयात राबविण्यात येत असून २१ मार्चपासून सुरूवात मोहीमेच्या उदघाटनाने करण्यात आली आहे. यानिमित्ताने २४ मार्च रोजी जनजागरण रॅली निघणार आहे. जनजागरण मोहीमेंतर्गंंत जिल्हयात २३ मार्च ते २८ मार्चपर्यंंत विविध ठिकाणी क्षयरोग निदान शिबीरे व जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये अनसिंग येथील ग्रामीण रूग्णालयात २३ मार्च रोजी क्षयरोग निदान शिबीर घेण्यात आले. २४ मार्चला वाशिम येथील सामान्य रूग्णालय, २५ मार्चला रिसोड, मानोरा व मंगरूळपीर , २६ मार्चला कारंजा ग्रामीण रूग्णालय, २७ मार्चला मालेगाव ग्रामीण रूग्णालय व २८ मार्चला कामरगाव ग्रामीण रूग्णालयात क्षयरोग उपचार पथक व सुक्ष्म दर्शक केंद्राव्दारे जनजागरण व शिबीरे घेण्यात येणार आहेत.