कपाशी रक्षणासाठी लावले सापळे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:38 IST2017-09-12T01:38:44+5:302017-09-12T01:38:54+5:30

वाशिम : कपाशीवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शे तकर्‍यांसमोरील अडचणीत भर पडत आहे. दरम्यान तालु क्यातील केकतउमरा येथील शेतकर्‍यांनी  कपाशीच्या  संरक्षणासाठी सापळे लावून पीक वाचविण्यासाठी धडपड  सुरू केल्याचे दिसून येते.

Traps trapped for protection of cotton! | कपाशी रक्षणासाठी लावले सापळे! 

कपाशी रक्षणासाठी लावले सापळे! 

ठळक मुद्देकेकतउमराच्या शेतकर्‍यांचा प्रयोगपीक वाचविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कपाशीवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शे तकर्‍यांसमोरील अडचणीत भर पडत आहे. दरम्यान तालु क्यातील केकतउमरा येथील शेतकर्‍यांनी  कपाशीच्या  संरक्षणासाठी सापळे लावून पीक वाचविण्यासाठी धडपड  सुरू केल्याचे दिसून येते.
केकतउमरा येथील बहुतांश शेतकर्‍यांनी विविध कंपनीच्या  बियाणाच्या कपाशी वाणाची लावगड केली. यामधुन शे तकर्‍यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. ये थील प्रगतीशील शेतकरी श्रीराम वाठ यांच्या शेतातील क पाशी पिकांची पाहणी केली असता, किडीचा प्रादूर्भाव  झाल्याचे निदर्शनात आले. कपाशी पिकाला किडे, किटक,  पांढरी माशी यापासून धोका होऊ नये म्हणून कृषी समृद्धि ग्राम  विकास समितीचे सचिव प्रविण पट्टेबहादुर यांनी या शेतात  तब्बल एका एकराच्या कपाशी पिकात चिकट सापळे लावून  दिले. त्याचबरोबर पक्षी थांबे देखील लावले. एका एकराच्या  भागात रात्रीच्या वेळीला प्रकाशाची व्यवस्था केली.  जेणेकरुन शेतातील सर्व कीटक कृमी, डास व नाकतोडा  अशे विविध प्रकारचे कीडे या उजेडात येवून मरण पावतात   व आपल्याला या कपाशी पिकाचे होणारे नुकसान थांबवता  येईल. याप्रमाणेच अन्य शेतकरीदेखील चिकट सापळे लावून  पीक वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येते.  हा प्रयोग गावालगतच्या अन्य शेतातदेखील केला जाणार  आहे. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी कृषी समृद्धि वाशिम  क्लस्टरचे व्यवस्थापक रमेश बादाडे, संदीप बकाल, मदन  श्रीखंडे, निखिल बळी यांनी सहकार्य केले.

असा आहे प्रयोग!
विविध प्रकारच्या किडी, किटकांमुळे कपाशीचे अतोनात  नुकसान होते. त्याचा प्रत्यक्ष परिणाम उत्पादनावर होत  असल्याने शेतकरी त्रस्त होतात. दरम्यान, कपाशीचे या  किडींपासून रक्षण व्हावे, यासाठी लावल्या जाणार्‍या चिकट  सापळ्यांमुळे किडे, किटुकले त्यात अडकून मरण पावतात.  यासाठी ठराविक ठिकाणी लाईटचा उजेडही केला जात  असल्याने किडे, किटुकले आकर्षित होत असल्याची माहि ती प्रविण पट्टेबहादूर यांनी दिली.

Web Title: Traps trapped for protection of cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.