वाशिम जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्या

By Admin | Updated: May 13, 2017 05:18 IST2017-05-13T04:54:12+5:302017-05-13T05:18:15+5:30

कर्मचा-यांच्या प्रशासकीय व विनंतीवरून समुपदेशन पद्धतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बदल्या करण्यात आल्या.

Transfer of Washim Zilla Parishad employees | वाशिम जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्या

वाशिम जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्या

वाशिम : जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंतीवरून समुपदेशन पद्धतीने शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बदल्या करण्यात आल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद कापडे यांच्यासह प्रत्येक विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या.
आरोग्य विभागातील १३ कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून तर एक बदली आपसी करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील दोन, कृषी दोन, अर्थ विभागातील चार, पंचायत विभागातील १०, सामान्य प्रशासन विभागातील १७ अशा विभागनिहाय गट क व गट ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या.

Web Title: Transfer of Washim Zilla Parishad employees