कारंजा तालुक्यात प्रशासकीय कारणांवरून ८ तलाठ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:24+5:302021-08-15T04:41:24+5:30
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक बदली २०२१ तलाठी संवर्ग, कारंजा उपविभागातील बदलीस पात्र असलेले तलाठी यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात ...

कारंजा तालुक्यात प्रशासकीय कारणांवरून ८ तलाठ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक बदली २०२१ तलाठी संवर्ग, कारंजा उपविभागातील बदलीस पात्र असलेले तलाठी यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. सजात कार्यरत तलाठी यांच्या विनंतीवरून तसेच त्यांनी दिलेल्या सजाच्या गावांच्या पसंतीनुसार त्यांची नवीन सजांच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
-----------
या तलाठयांची झाली बदली
कारंजा तालुक्यातील धामणी येथील तलाठी एस. व्ही. सावरकर यांची हिवरालाहे येथे, सोहळ येथील तलाठी व्ही. झेड. राठोड यांची सोमठाणा येथे, वालई येथील तलाठी सुषमा डांगे यांची बदली सोहळ येथे, हिवरालाहे येथील तलाठी नितीन घाटे यांची बदली बेंबळा येथे, सोमठाणा येथील तलाठी एस. एन. लाड यांची बदली मनभा भाग २ येथे, विळेगाव येथील तलाठी सविता देशमुख यांची बदली वालई येथे, मनभा भाग २चे तलाठी आर. एस. कोकाटे यांची बदली विळेगाव येथे, तर बेंबळा येथील तलाठी ए. व्ही. गुगळे यांची बदली धामणी, ता. कांरजा येथे करण्यात आली आहे. उपरोक्त तलाठ्यांच्या विनंतीवरून बदलीस पात्र असलेल्या तलाठ्यांना कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता पदग्रहण अवधीसाठी प्राप्त राहणार नाही. तसेच संबंधित मंडल अधिकारी यांनी त्यांच्या मंडळातील संबंधित तलाठ्यांच्या प्रभार हस्तांतरण कार्यवाहीचा अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालय, कारंजा या कार्यालयात सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.