वाशिम जिल्हा परिषद सदस्यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा

By Admin | Updated: December 3, 2014 23:44 IST2014-12-03T23:44:24+5:302014-12-03T23:44:24+5:30

यशदाचे प्रशिक्षण समन्वयक देविदास ढगे याचे विवादीत वक्तव्यावर आक्षेप.

Training and workshops for members of Washim Zilla Parishad | वाशिम जिल्हा परिषद सदस्यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा

वाशिम जिल्हा परिषद सदस्यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा

वाशिम : राजीव गांधी पंचायतराज सशक्तीकरण अभियान अंतर्गत यशदा व वाशिम जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने जि.प.सदस्यांसाठी तीन दिवसांच्या प्रशिक्षण कायार्शाळेचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त कार्यालयातील यशदा चे प्रशिक्षण समन्वयक देविदास ढगे यांनी पंचायतराज आणि लोकप्रतिनिधींची भूमिका व जबादार्‍या या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी औरंगाबाद येथील प्रशिक्षक आचार्य बागडे यांची उपस्थिती होती.
केंद्र आणि राज्य शासनाच्या २५0 हुन अधिक योजना आहेत. त्यांचा अभ्यास करुन गावात राबवल्या गेल्या पाहिजे, असे ते म्हणाले. उपस्थित जि.प.सदस्यांनी ग्रामविकासाच्या अनेक मुद्यावर ढगे यांच्यासोबत संवाद साधला. शासनाच्या योजना चांगल्या असतात, मात्र गावकर्‍यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे त्या योजना अपयशी होतात. या ढगे यांच्या वक्तव्यावर गजानन अमदाबादकर यांनी आक्षेप घेतला. अमदाबादकर म्हणाले योजनांच्या अपयशाचे खापर सामान्य माणसावर फोडणे चुकीचे असुन अज्ञानामुळे माणसे नकारात्मक बनतात. ते दूर करण्याची जबाबदारी शासनाची आहे.
यशदा च्या प्रशिक्षणात स्वच्छता अभियानाचा समावेश आता यापुढील यशदाच्या वतिने देण्यात येणार्‍या सर्व प्रशिक्षणात केंद्र शासनाच्या अतिशय महत्वपुर्ण असलेल्या स्वच्छ भारत अभियान या योजनेचा समावेश करण्यात आला आहे. सर्व लोकप्रतिनिधींना ही योजना समजावी हा या मागचा उद्देश आहे. याबाबतचे पत्र शासनाकडून यशदा या प्रशिक्षण संस्थेला प्राप्त झाले असल्याची माहिती ढगे यांनी प्रशिक्षणादरम्यान दिली. प्रशिक्षणाला जि.प. अध्यक्षा सोनाली जोगदंड, महिला व बालकल्याण सभापतीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Training and workshops for members of Washim Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.