ट्रकच्या धडकेत शिक्षक ठार
By Admin | Updated: May 20, 2014 01:22 IST2014-05-20T01:22:10+5:302014-05-20T01:22:53+5:30
मालेगाव-मेहकर मार्गावर मोटारसायकलवरुन जाणार्या एका शिक्षकाला एका ट्रकने उडवले.

ट्रकच्या धडकेत शिक्षक ठार
मालेगाव: मालेगाव-मेहकर मार्गावर मालेगावमार्गे मेहकर येथे मोटारसायकलवरुन जाणार्या एका शिक्षकाला एका ट्रकने उडवले असल्याची घटना १८ मेच्या रात्री घडली. या घटनेबाबत अविनाश बळीराम वानखेडे रा.कळंबेश्वर यांनी मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार १८ मेच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील हनवतखेडा येथील शिक्षक ङ्म्रीधर तुकाराम भगत (वय ३५) हे वाशिम येथून मेहकरकडे डिस्कव्हर मोटारसायकलने जात असताना पांगरी नवघरे ते डोंगरकिन्हीच्यामध्ये भरधाव जाणार्या ट्रक क्र.एम.एच.२६-८४५६ या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला भरधाव वेगाने धडक दिली. त्यात भगत हे जागीच ठार झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पो.स्टे.चे एपीआय ए.के.कांबळे, एपीआय कुलवंत, हे.पो.कॉं.जगन्नाथ घाटे, प्रसाद योगासने, सुनील काळदाते, सुनील इढोळे हे घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास नांदगावकर व त्यांचे सहकारी करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी रहदारीची व्यवस्था सुरळीत केली. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच येवता येथील ज्ञानेश्वर शिंदे या शिक्षकाचा अशाचप्रकारे भरधाव वेगात धावणारे वाहन उलटल्यामुळे मृत्यू झाला होता. मालेगाव परिसरात एकामागुन एक दररोज घडत असलेल्या अपघाताने समाजमन सुन्न झाले आहे.