वाहतूक पोलिसास लाच घेताना पकडले
By Admin | Updated: January 1, 2015 01:30 IST2015-01-01T01:30:09+5:302015-01-01T01:30:09+5:30
मंगरूळपीर येथे लाचलुचपत विभागाची कारवाई.

वाहतूक पोलिसास लाच घेताना पकडले
मंगरुळपीर (वाशिम) : ऑटोचालकाकडून १५0 रुपये लाच म्हणून स्वीकारताना वाहतूक पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक अकोल्याच्या पथकाने ३१ डिसेंबर रोजी रंगेहात पकडले. मंगरुळपीर येथील वाहतूक पोलीस किरण मधुकरराव गुहे याने एका ऑटोचालकाला २00 रुपये हप्त्याप्रमाणे लाच देण्याची मागणी केली होती. याबाबत सदर ऑटोचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून मानोरा चौकात पोलिसास रंगेहात पकडले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोलाचे पोलीस उपअधीक्षक यू.के. जाधव यांनी आरोपी गुहे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७, १३ (१) (ड) १३, (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.