वाहतुकीस अडथळा; ‘डीजे’ संचालकावर कारवाई

By Admin | Updated: March 29, 2016 02:20 IST2016-03-29T02:20:48+5:302016-03-29T02:20:48+5:30

पोलिसांनी डीजे वाहनचालक कांबळे याच्याविरुद्ध वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

Traffic obstruction; Action on "DJ" Operator | वाहतुकीस अडथळा; ‘डीजे’ संचालकावर कारवाई

वाहतुकीस अडथळा; ‘डीजे’ संचालकावर कारवाई

वाशिम: शिवजयंतीनिमित्त मिरवणुक सुरू असताना डीजे वाहनचालकाने आपले वाहन रस्त्याच्या मधोमध उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलिसांनी डीजे वाहनधारक कांबळे याचेविरुद्ध कलम २८३ अन्वये २६ मार्चला गुन्हा दाखल केला. शहरात २६ मार्च रोजी शिवजयंतीनिमित्त शोभायात्रा सुरू होती. या शोभायात्रेदरम्यान सायंकाळी ५:४0 वाजता सराफा लाइन परिसरात कांबळे याने आपले डीजेचे वाहन रस्त्याच्या मधोमध उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. या प्रकरणी सरकारतर्फे पंजाब घुगे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी डीजे वाहनचालक कांबळे याच्याविरुद्ध वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.

Web Title: Traffic obstruction; Action on "DJ" Operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.