मुख्य रस्त्यावरील हातगाड्यांनी वाहतुकीस खोळंबा
By Admin | Updated: July 30, 2014 00:34 IST2014-07-30T00:34:11+5:302014-07-30T00:34:11+5:30
मुख्य रस्त्यांवर हातगाडयांवर व्यवसाय करणारे उभे राहत असल्याने वाहतुकीस खोळंबा होत आहे.

मुख्य रस्त्यावरील हातगाड्यांनी वाहतुकीस खोळंबा
रिसोड : शहरातील मुख्य रस्त्यांवर हातगाडयांवर व्यवसाय करणारे उभे राहत असल्याने वाहतुकीस खोळंबा होत आहे. शहरातील आंबेडकर चौक ते लोणीफाटा या रस्त्यावर वाहनांची नेहमीच रेलचेल असते. या रस्त्यावर शहरातील भारत माध्यमिक शाळा, सनराईज इंग्लीश स्कूल न. परिषद उर्दू शाळा जि.प. शाळा ही महत्वाची शाळा व महाविद्यालय आहेत. पण या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीचा खोळंबा कायम आहे. याशिवाय पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर हातगाडे आणि पारवे रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या या वाहनाचे प्रमाण आधीच वाढल्याने वाहतुकीचा खोळंबा आधीच प्रमाणात दिसून येत आहे. जर रस्त्यावर दोन मोठी वाहने आले तर या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे पायी चालणार्यांना आणि दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी व न.परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देवून ही समस्या सोडविणे गरजेचे आहे.