वाशिम-हिंगोली मार्गावरील वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:43+5:302021-02-05T09:24:43+5:30
राष्ट्रीय मतदार दिन साजरा जऊळका रेल्वे : परिसरातील शाळांमध्ये २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकांकडून राष्ट्रीय मतदार दिन ...

वाशिम-हिंगोली मार्गावरील वाहतूक ठप्प
राष्ट्रीय मतदार दिन साजरा
जऊळका रेल्वे : परिसरातील शाळांमध्ये २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकांकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांना मतदानाचा अधिकार देणारा भारत हा आघाडीचा देश असल्याचा सूर या माध्यमातून उमटला.
...................
रोजंदारी मजुरांची ज्येष्ठता सूची प्रसिद्ध
वाशिम : जिल्ह्यातील सर्व फळ रोपवाटिका, तालुका बीज गुणन केंद्र येथील रोजंदारी मजुरांची अंतरिम ज्येष्ठता सूची जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर सूची लावण्यात आलेली आहे.
...............
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले
किन्हीराजा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. त्याकरिता प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ३१ जानेवारीपर्यंत ते ऑनलाइन स्वरूपात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
...............
सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीकडे लक्ष
मालेगाव : तालुक्यातील सन २०२०-२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ८३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण सोडत २ फेब्रुवारी रोजी असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
..............
रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
मेडशी : सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान विशेष अभियान राबविण्याचे शासनाने आदेश आहेत; मात्र परिसरातील रस्त्यांवर अवैध वाहतूक, टिबल सीट, विना हेल्मेट प्रवास सुरू असतानाही कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.
...............
शिबिरात शंभरावर रुग्णांची तपासणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, २७ जानेवारी रोजी झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात शंभरावर रुग्णांची तपासणी करण्यात आली. यासह रुग्णांना औषधोपचारही देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.
.................
शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाशिम : चार दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय वादातून शहरात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. नियमाचा भंग करू नये, असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
...............
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
वाशिम : पॅसेंजर रेल्वे बंद असल्यामुळे दवाखान्यानिमित्त नियमित अकोला येथे जाण्याकरिता रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पॅसेंजर सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रशांत मोहिते यांनी वाशिम रेल्वे स्थानक प्रमुखांकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली आहे.