पारंपारिक दांडिया नृत्यात आधुनिकेतची भर

By Admin | Updated: September 29, 2014 02:21 IST2014-09-29T02:21:30+5:302014-09-29T02:21:30+5:30

लोकमत परिचर्चेतील सूर; अश्लिलतेला थारा नको, पालकांचा सहभाग हवा.

Traditional dandiya dancing is a modern addition to modernism | पारंपारिक दांडिया नृत्यात आधुनिकेतची भर

पारंपारिक दांडिया नृत्यात आधुनिकेतची भर

शिखरचंद बागरेचा / वाशिम
संपूर्ण राज्यात पुर्वीच्या काळापासून दांडिया नृत्य नवरात्रोत्सवादरम्यान भक्तीपुर्ण व उत्साहपुर्वक वा तावरणात खेळल्या जातो. पारंपारिकरित्या होणार्‍या दांडिया नृत्यामध्ये गत काही वर्षांंपासून आधुनिक तेची भर पडली असून दिवसेंदिवस यामध्ये विभत्सपना व अलिता वाढत आहे. दांडीयाचे स्वरुप बदलत असले तरी त्यामध्ये अलितेचा धारा नको असे परखड सुर लोकमतच्या वतीने ह्यदांडिया नृ त्याचे बदलते स्वरुपह्ण या विषयावर आयोजित परिचर्चेत सहभागी झालेल्या भगिनींनी व्यक्त केले.
लोकमत जिल्हा कार्यालयात रविवार २८ सप्टेंबर रोजी ह्यदांडिया नृत्याचे बदलते स्वरुपह्ण या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत शहरातील सिमा राजगुरु, हर्षा पसारकर, संतोष अग्रवाल, संगीता जैस्वाल व संध्या मानधने या भगिनींनी सहभाग घेतला होता. पुरातन काळापासून चालत आलेली दांडिया प्रथा काळानुरुप दिवसागणिक बदलत चालली आहे. नाविन्यपुर्ण व आधुनिक दांडिया नृत्याने पारंपारीक दांडिया नृत्य वे मुळ संस्कृतीला तडा दिल्या जात आहे. दांडियामध्ये सुंदर व आकर्षक वेशभुषा, आधुनिक संगित वाद्यवृंद तसेच आधूनिक उपहाराने जागा घेतली आहे, अशा परिस्थीतीत जुनी पद्धत मोडीस निघत असून, नवीन विभत्स पद्धतीने दांडिया खेळल्या जात आहे. याचा परिणाम युवक युवतींमध्ये जवळीक वाढून विभत्सपणा व अश्लिलतेसोबत दांडीया नृत्याव्दारे होणारे गैरप्रकार चिंतनाचा विषय ठरत आहे.
आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे दांडिया नृ त्य उत्सवात पालकांचा सहभाग अत्यंत आवश्यक ठरत असल्याचे मत सुद्धा परिचर्चेत उपस्थितीत भगिनींनी परिचर्चेत व्यक्त केले.

Web Title: Traditional dandiya dancing is a modern addition to modernism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.