शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक व्यवसाय ‘लॉकडाऊन’; फेटे बांधणाऱ्याने टाकली पीठ गिरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 22:58 IST

पानटपरीवाला भाजीपाला विकतोय तर लग्नसराईत फेटे बांधण्याचे काम करणाऱ्याने पिठगिरणी थाटली आहे.

- प्रफुल बानगावकर लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने अनेक लघु व्यवसाय अडचणीत सापडले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कारंजातील अनेकांनी आपले पारंपारिक व्यवसाय बदलले आहेत. पानटपरीवाला भाजीपाला विकतोय तर लग्नसराईत फेटे बांधण्याचे काम करणाऱ्याने पिठगिरणी थाटली आहे.कारंजा शहरात लघु व्यवसायिकांची संख्या दीड हजारावर आहे. तसेच हातगाडया व बाराबलुतेदार पध्दतीने व्यवसाय करणारे व्यवसायिकसुध्दा आजही आपला व्यवसाय नित्यनियमाने करतात. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी आहे. लॉकडाऊनचा फटका लघु व्यावसायिकांनादेखील बसला आहे.  कपडे प्रेस करणे, गुपचुपची गाडी, केशकर्तनालय, चहाटपरी, पानठेला, भेळ गाडी, ब्युटी पॉर्लर, हॉटेल व्यवयाय, वाहन चालक आदी काही लघुव्यसायीकांवर उपासमारीची वेळ आहे. लॉकडाऊनच्या या विपरित परिस्थितीत अनेकांनी हिम्मत न हारता कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसºया व्यवसाय, धंद्याची निवड केली आहे. येथील हॉटेल व्यवसाय करणारे श्रीपाद रेवाळे यांनी आता डेली निड्स हा व्यवसाय सुरू केला. पानठेला संचालक हितेश डिके यांनी भाजीपाला विक्री हा पर्यायी व्यवसाय सुरू केला. कपडे प्रेस करणे, लग्नसराईत फेटे बांधण्याचा व्यवसाय करणारे गजानन आसरे यांनी पिठ गिरणीचा व्यवसाय निवडला आहे. पर्यायी व्यवसाय निवडून लघु व्यावसायिक कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे कारंजा शहरात दिसून येते. इतरांसाठी प्रेरणादायीलॉकडाऊनमुळे पारंपारिक व्यवसाय करणे अवघड असले तरी हताश न होता अनेकांनी पर्यायी व्यवसाय, धंदे निवडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला आहे. ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा