चाचणी न केल्यास व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:42 IST2021-03-17T04:42:36+5:302021-03-17T04:42:36+5:30

शहरात कोरोना पथक तयार करून लाऊडस्पीकरव्दारे व्यापक प्रचार करण्यात येत आहे. याकरिता कारंजा शहरातील व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र ...

Traders will not be able to do business without testing | चाचणी न केल्यास व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार नाही

चाचणी न केल्यास व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार नाही

शहरात कोरोना पथक तयार करून लाऊडस्पीकरव्दारे व्यापक प्रचार करण्यात येत आहे. याकरिता कारंजा शहरातील व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र जे व्यावसायिक कोरोना चाचणी करणार नाहीत त्यांची गय केली जाणार नसल्याचे कारंजा नगर परीषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हाकर यांनी सांगितले. नगर परिषदेकडूून कोरोना प्रतिबंधक पथक तयार करण्यात येऊन पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. पथकांनी शहरातील कापड दुकान, औषध दुकान, भाजीपाला, फळे विक्रेता, हातगाडी चालक, दूध डेअरी, पीठगिरणी, सलून, हाॅटेल, जनरल स्टेअर्स इत्यादी दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांनी व त्यामधील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे तसे प्रमाणपत्र सोबत ठेवण्यास सांगितले, अन्यथा व्यवसाय करता येणार नाही व आपत्कालीन व्यवस्थापन नियमानुसार करावाई करण्यात येईल.

................

काेराेना चाचणीस व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

व्यापाऱ्यांसाठी कारंजा शहरात दोन कोरोना चाचणी तपासणी केंद्र आहेत. मुलजी जेठा हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा बायपास येथे १५ मार्च रोजी १५८ व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी कोरोना चाचणी करून घेतली. काही व्यापारी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन चाचणीस प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले.

.........

काेराेना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने सर्व व्यापारी, दुकानदारांची काेराेना चाचणी बंधनकारक केली आहे. जे व्यावसायिक कोरोना चाचणी करतील नाही त्यांची गेय केली जाणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी चाचणी करून घ्यावी.

-दादाराव डाेल्हारकर

मुख्याधिकारी, कारंजा नगर परिषद

Web Title: Traders will not be able to do business without testing