कोरोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांची रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:37+5:302021-03-22T04:37:37+5:30
.......... लसीकरण करून घेण्याचे आवाहन वाशिम : ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या विविध आजारग्रस्त नागरिकांनी प्राधान्याने ...

कोरोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांची रांग
..........
लसीकरण करून घेण्याचे आवाहन
वाशिम : ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या विविध आजारग्रस्त नागरिकांनी प्राधान्याने कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
............
एस.टी. प्रवासामध्ये नियमांचा फज्जा
वाशिम : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही एस.टी. प्रवासात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, प्रवाशांनी नियम पाळावे, असे आवाहन आगारप्रमुख विनोद इलामे यांनी केले.
..........................
जऊळका परिसरात प्रचंड नुकसान
वाशिम : १९ मार्च रोजी झालेल्या गारपिटीमुळे जऊळका परिसरातील रबी पिकांसह फळपिके व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भरपाई तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
..........................
मेडशीतील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, अनेकांना अहवाल काय येणार, याची प्रतीक्षा लागून आहे.
...............
किन्हीराजा येथील हातपंप नादुरुस्त
वाशिम : किन्हीराजा (ता.मालेगाव) येथे टंचाईच्या काळात हातपंपाचा मोठा आधार मिळतो. उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असून, हातपंप दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
.............................
शिरपूर येथे गर्दीचा उच्चांक
वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासकीय पातळीवरून वारंवार केले जात आहे. मात्र, शिरपुरातील बाजारपेठेत दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.