ट्रॅक्टरची बसला धडक; गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 3, 2017 02:11 IST2017-04-03T02:11:35+5:302017-04-03T02:11:35+5:30
ट्रॅक्टरने बसला मागून धडक दिल्याने एस.टी.बसचे १0 हजार रुपयांचे नुकसान झाले.

ट्रॅक्टरची बसला धडक; गुन्हा दाखल
मंगरुळपीर (वाशिम), दि. २- ट्रॅक्टरने बसला मागून धडक दिल्याने एस.टी.बसचे १0 हजार रुपयांचे नुकसान झाले. २ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी आसेगाव पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसचालक शंकर पांडुरंग बोरकर (वय ४५ वर्षे) यांनी पोलिसात तक्रार दिली, की २ एप्रिल रोजी रिसोड आगाराची बस क्रमांक एम.एच.४0 वाय, ५३५६ ही चंद्रपूरवरुन रिसोडकडे प्रवासी घेऊन जात असताना तालुक्यातील दस्तापूरजवळ भरधाव येणार्या ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.४५ एस १५८७ ने बसला मागून धडक दिली. यामध्ये बसचे १0 हजार रुपयांचे नुकसान झाले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी टॅक्टर चालकविरुद्ध कलम २८९, ४२७ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर बस रस्त्याच्या कडेला उभी केल्यानंतर प्रवाशांना तापत्या उन्हात दुसरी बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागले.