ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार!

By Admin | Updated: May 14, 2017 14:03 IST2017-05-14T14:03:14+5:302017-05-14T14:03:14+5:30

दुचाकीस्वार जागीच ठार झाला; तर अन्य एकजण जखमी झाला.

Tractor bike bikes; One killed! | ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार!

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार!

शिरपूरजैन (वाशिम) : रिसोडहून गिट्टी घेवून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने केशवनगर या गावानजिक दुचाकीस जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला; तर अन्य एकजण जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
दापुरी येथील शालीकराम शेषराव जाधव (वय २५ वर्षे) हे आपल्या भावाचा मुलगा कर्तव्य शंकर जाधव (वय ७ वर्षे) यास घेवून केशवनगर येथे जात होते. दरम्यान, रिसोडहून गिट्टी घेवून येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३७ २०७१) दुचाकीस जबर धडक दिली. यात शालिकराम जाधव हे गंभीर जखमी झाले; तर कर्तव्यचा पाय तुटून बाजूला पडला. उपचारासाठी नेत असताना शालिकराम जाधव यांचा मृत्यू झाला.

Web Title: Tractor bike bikes; One killed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.