ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात; एक ठार, दोन गंभीर
By Admin | Updated: April 18, 2016 02:19 IST2016-04-18T02:19:20+5:302016-04-18T02:19:20+5:30
रिसोड-हिंगोली मार्गावरील घटना.

ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात; एक ठार, दोन गंभीर
रिसोड (जि. वाशिम ): ट्रॅक्टर व दुचाकीची जोरदार धडक झाल्याने एक जण जागीच ठार तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रिसोड ते हिंगोली मार्गावरील सातपट्टय़ाजवळ १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दोन जखमींना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातीची वाहतूक करणारा एमएच ३७ ई ७७९ क्रमांकाचा ट्रॅक्टर हिंगोलीकडे जात असताना, मागून येणार्या एमएच २८ एई ५४७२ क्रमांकाच्या दुचकीने या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दुचाकीची ट्रॉलीला धडक बसली. यामध्ये एक जण ठार, तर त्याच्या मागील दोघे जखमी झाले. मोटारसायकलवर तिघे प्रवास करीत होते. मेहकर तालुक्यातील मोहनखेड येथील रमेश दांडेकर असे मृतकाचे नाव असून, अविनाश यातलकर व शेषराव मंजूलकर हे जखमी आहेत.