मंगरूळपीर येथे उद्या उपविभागस्तरीय समाधान शिबिर
By Admin | Updated: June 24, 2017 13:19 IST2017-06-24T13:19:55+5:302017-06-24T13:19:55+5:30
खरेदी-विक्री संघाच्या सहकार भवनमध्ये विस्तारित समाधान शिबिर होणार आहे.

मंगरूळपीर येथे उद्या उपविभागस्तरीय समाधान शिबिर
वाशिम : मंगरूळपीर उपविभागातील नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी २५ जून २०१७ रोजी महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरेदी-विक्री संघाच्या सहकार भवनमध्ये विस्तारित समाधान शिबिर होणार आहे.
मंगरूळपीर उपविभागस्तरीय समाधान शिबिरासाठी नागरिकांकडून १७ एप्रिल ते १० जून २०१७ या कालावधीत तहसीलस्तरावर तक्रारी मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपविभागातील नागरिकांचे ८६ तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जांचा निपटारा पालकमंत्री ना. राठोड यांच्या उपस्थितीत होणार आहे.