उद्या पोलिओ लसीकरण
By Admin | Updated: February 20, 2016 02:22 IST2016-02-20T02:22:17+5:302016-02-20T02:22:17+5:30
वाशिम जिल्ह्यात ९३२ केंद्रांवर एक लाख २८ हजार बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे.

उद्या पोलिओ लसीकरण
वाशिम : जिल्ह्यात २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपयर्ंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार असून, जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ९३२ केंद्रांवर 0 ते ५ वर्षे वयोगटातील एक लाख २८ हजार ५५0 बालकांना पोलिओची लस दिली जाणार आहे. २१ फेब्रुवारी २0१६ रोजी जिल्ह्यात पोलिओ लसीकरण मोहीम असून, या मोहिमेच्या यशस्वितेसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधितांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. पल्स पोलिओ समन्वय समितीच्या बैठकीत राहुल द्विवेदी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिसोदिया, शिक्षणाधिकारी ए.एस. पेंदोर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी ए. एम. यावलीकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर, राज्य परिवहन महामंडळाचे प्रतिनिधी एम.एन. हिवाळे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पोतदार आदींनी लाभार्थींची संख्या तसेच मोहिमेबाबत आढावा घेतला.