शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video - जामदराच्या शेतकऱ्यांची किमया, टोमॅटोतून 13 लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 15:46 IST

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. अडाण प्रकल्पात मुबलक पाणी उपलब्ध असताना पिकांच्या वाढीसाठी योग्य खतांचा प्रमाणानुसार प्रभावी करून त्यांनी ही किमया साधली आहे. जामदरा घोटी येथील गणेश गावंडे आणि विकास थेर यांनी उत्पादित केलेल्या टोमॅटोचा दर्जा अतिशय चांगला आहे.

नरेश आसावा

इंझोरी (वाशिम) - वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पाणीटंचाईमुळे अडचणीत आले असताना मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोच्या पिकातून 13 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी शिवारात अनेक शेतकरी रब्बी हंगामानंतर अडाण प्रकल्पातीन पाण्याच्या आधारे भाजीपाला पिकांचे भरघोस उत्पादन घेतात. यंदाही येथील १५ ते २० शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. तथापि, यात विकास थेर आणि गणेश गावंडे या दोन शेतकऱ्यांनी मिळून अवघ्या एक हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून योग्य नियोजनाच्या आधारे तब्बल १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. अडाण प्रकल्पात मुबलक पाणी उपलब्ध असताना पिकांच्या वाढीसाठी योग्य खतांचा प्रमाणानुसार प्रभावी करून त्यांनी ही किमया साधली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे दोन्ही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भरघोस उत्पादन घेत आहेत. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत त्यांचे टोमॅटोचे उत्पादन दुप्पट असल्याने सर्वांसाठी हा आश्चर्याचा विषय ठरला आहे. अद्यापही त्यांच्या शेतातील टोमॅटोची झाडे फळांनी लदबदलीच असून, त्यांची ही शेती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी जामदरा घोटी येथे येत आहेत. 

दिल्लीच्या बाजारात विक्री

जामदरा घोटी येथील गणेश गावंडे आणि विकास थेर यांनी उत्पादित केलेल्या टोमॅटोचा दर्जा अतिशय चांगला आहे. स्थानिक बाजारात त्या टोमॅटोला अपेक्षित दर मिळणार नाहीत.  ही जाण त्यांना होती. त्यामुळे अथक परिश्रम घेऊन पिकविलेल्या टोमॅटोला दरही चांगले मिळावे म्हणून त्यांनी दिल्लीच्या बाजारपेठेची निवड केली. त्यांनी आजवर सहा हजारांहून अधिक कॅरेट टोमॅटोची तोडणी करून ते दिल्लीच्या बाजारात विकले आहेत. प्रति कॅरेट ३०० ते ५०० रुपयांचे दर त्यांना या बाजारात मिळाले. आता उर्वरित टोमॅटोची काढणी करून त्यांची विक्रीही दिल्लीच्या बाजारात करण्याचे त्यांनी ठरविले आहे. दरम्यान, त्यांच्या या शेतीमुळे परिसरातील अनेक मजुरांच्या हातालाही काम मिळाल्याचे दिसत आहे.

आणखी ४ लाखांची आशा

जामदरा घोटी येथील विकास थेर आणि गणेश गावंडे यांनी आजवर त्यांच्या टोमॅटो पिकातून तब्बल १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवित सर्वांना चकित केले असले तरी, अद्यापही त्यांच्या शेतातील टोमॅटोच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लागली आहेत. त्या टोमॅटोतून आणखी ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास दोघांनीही व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी