महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आजपासून वाढ
By Admin | Updated: March 14, 2015 01:37 IST2015-03-14T01:37:49+5:302015-03-14T01:37:49+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय.

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आजपासून वाढ
अकोला : मध्य रेल्वे मार्गावर दररोज अकोलामार्गे धावणार्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये १४ मार्चपासून वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दररोज १३४६ कि.मी. अंतर कापणार्या या गाडीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय बुधवारी घेतला. मध्य रेल्वे प्रशासनाने १९९२ मध्ये सुरू केलेल्या या गाडीमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. वेटिंगमुळे तिकीट रद्द करणार्यांचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा आर्थिक फटका रेल्वेला सहन करावा लागत होता. सुपरफास्टचा अधिभार लागत नसल्याने या गाडीला प्रवाशांची कायम गर्दी राहते. वेटिंगवर राहणार्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन या गाडीला शनिवारपासून आणखी एक स्लीपर क्लास डबा कायमस्वरूपी जोडणार आहे. ५५ कि.मी. प्रतितास या गतीने धावणार्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला यापुढे एक द्वितीय श्रेणी वातानुकूल, एक तृतीय श्रेणी वातानुकूल, ९ स्लीपर आणि ५ सामान्य डबे असे १६ डबे राहणार आहेत.