मतदार जागृतीसाठी आज सायकल रॅली
By Admin | Updated: October 5, 2014 01:42 IST2014-10-05T01:42:19+5:302014-10-05T01:42:19+5:30
निवडणूक यंत्रणेचा उपक्रम; विविध संघटनांचा सहभाग.

मतदार जागृतीसाठी आज सायकल रॅली
वाशिम : विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक यंत्रानेमार्फत विविध उपक्रम राबवली जात आहेत. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी वाशिम शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी १0 वाजता ही रॅली मार्गस्थ होणार आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक इंदू धर, मतदार जागृतीविषय निवडणूक निरीक्षक सुखचैन सिंग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पारनाईक यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती वाशिम मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी दिली.मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने स्वीप कार्यक्रम हाती घेतला आहे. याद्वारे पथनाट्य, निर्धार रथ, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फलक आदी माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन केले जात आहे. मतदार जागृतीमध्ये विविध संघटनांचाही सहभाग असून रविवारी होणार्या सायकल रॅलीमध्येही शिवाजी शिक्षण संस्था, नेहरू युवा केंद्र, लॉयन्स क्लब, मारवाडी युवा मंच, सत्यसाई सेवा समिती, जिल्हा बार असोसिअशन, डॉक्टर्स असोसिएशन, माळी युवा मंच आदी संघटना व शहरातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती बिजवल यांनी दिली.