आज संत झोलेबाबा यात्रा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:46+5:302021-02-05T09:23:46+5:30
दरवर्षी पौष पोर्णिमेला चिखली येथे संत झोलेबाबा यांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो , त्यानिमित्ताने या काळात ...

आज संत झोलेबाबा यात्रा महोत्सव
दरवर्षी पौष पोर्णिमेला चिखली येथे संत झोलेबाबा यांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो , त्यानिमित्ताने या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी असून शासनाने याविषयी जी नियमावली जाहीर केली त्यानुसारच बाबांचा यात्रा महोत्सव पहिल्यांदा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. २८ जानेवारी रोजी सकाळी ४ वा. बाबांची महापूजा ,अभिषेक ,सकाळी ६ वा.महाआरती, व नंतरचे नेहमीचे कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पाडण्यात येणार आहे. यावेळी मात्र दरवर्षीप्रमाणे होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून त्याऐवजी दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप बंद पाकिटातून करण्यात येईल अशी माहिती संस्थानच्यावतीने देण्यात आली आहे.