आज रावणदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:06 IST2017-09-30T01:06:29+5:302017-09-30T01:06:40+5:30

वाशिम: विजयादशमीनिमित्त श्री कालेश्‍वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, ३0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता स्थानिक माहूरवेश रावणदहन मैदानात रावणदहन व भव्य आतषबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Today Ravana Dahan | आज रावणदहन

आज रावणदहन

ठळक मुद्देआतषबाजी होणारदसरा महोत्सव मंडळाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विजयादशमीनिमित्त श्री कालेश्‍वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने शनिवार, ३0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता स्थानिक माहूरवेश रावणदहन मैदानात रावणदहन व भव्य आतषबाजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी,  नगराध्यक्ष हेडा, डॉ. हरिष बाहेती, जुगल मालपाणी, सुरेश लोथ यांची उपस्थिती राहील. यावेळी मुख्य कार्यक्रमानंतर भव्य आतषबाजीचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील नागरिकांनी रावणदहन व भव्य आतषबाजीच्या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने येण्याचे आवाहन श्री कालेश्‍वर दुर्गा व दसरा महोत्सव मंडळाचे अध्यक्ष नामदेव हजारे, उपाध्यक्ष स्वराज चौबे, लखन उपाध्ये, गणेश हजारे, महेश शर्मा, अंकित लोथ, सौरभ गट्टाणी, मनीष बत्तुलवार, गणेश बाळदी, रामचंद्र इंगळे, संतोष गोटे, सचिन लोलुरे, सूरज उपाध्ये, नीलेश शर्मा, विजय शर्मा, अजय संगेवार, सोनूभाऊ गुप्ता, रवी हजारे, विठ्ठल हजारे, राजू हजारे, बंडू हजारे, राजू बाळदी, कपिल शर्मा, राहुल बानकर, पवन माळेकर, गोपाल सोळंके, गणेश श्रीखंडे, महेश हजारे, अक्षय हजारे, सोनू दीक्षित, शिवानंद वाघमारे, नितीन ठाकूर, पवन ठाकूर, नीरज ठाकूर आदींनी केले आहे. 

Web Title: Today Ravana Dahan