आज जामगव्हाण येथे भव्य आदिवासी महासम्मेलन
By Admin | Updated: May 19, 2017 19:46 IST2017-05-19T19:46:10+5:302017-05-19T19:46:10+5:30
कारपा : जामगव्हाण ता.कळमनुरी येथे २० मे रोजी आंध आदिवासी संस्कृती संवर्धन व प्रबोधन महासम्मेलनाचे आयोजन करणयत आले आहे.

आज जामगव्हाण येथे भव्य आदिवासी महासम्मेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
कारपा : जामगव्हाण ता.कळमनुरी येथे २० मे रोजी आंध आदिवासी संस्कृती संवर्धन व प्रबोधन महासम्मेलनाचे आयोजन करणयत आले आहे. या संमेलनास जिल्६यातील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सम्मेलनाचे अध्यक्षस्थानी आदिवासी साहित्यीक प्रा.डॉ. राजेश धनकर तर उद्घाटक म्हणून माजी समाजिक न्यायमंत्री अॅड.शिवाजीराव मोघे , अध्यक्षा बाल सा.स.यवतमाळ सोनाली फुपरे हे करतील स्वागताध्यक्ष कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.संतोष टारफे , प्रमुख पाहुणे मारोतराव वंजारे, उत्तमराव इंगळे , , जनाबाई हुडूळे जि.प.अध्यक्षा नांदेड, आनंदराव डोखळे जेष्ठ सामाजिक कायर्कर्ते, ताराबाई लठाडर् , मोतीराम कदम , भास्कर ठाकरे, सखाराम जवादे , सोनाली बानोळे राहतील. सदर महासंमेलनास पंचश्री संत फुलाजी बाबा पटणा पूर राज्य हे उपस्थित राहीतल. तसेच उपस्थित सर्व आदिवासी समुदायांना आपल्या संस्कृती बद्दल तसेच एकत्रित पणाची वागणूक तसेच संस्कृती संवर्धन प्रबोधन समाजातील जेष्ठ साहित्यीकाकडून होणार आहे. जिल्हयातून मोठया संख्येने आध आदिवासी समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाश खुळे ग्रा.पं. कारपा, रामहरी लाव्हेर, गजानन झळके, संजय भुजाडे, मानोरा तसेच आदिवासी युवक संघटना मानोरा यांनी केले आहे.