पाचवी-सहावीचे विद्यार्थी सांभाळताना शिक्षकांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:00+5:302021-02-05T09:28:00+5:30
वाशिम : इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर शाळांनी दिलेल्या नियमांचे विद्यार्थ्यांकडून ...

पाचवी-सहावीचे विद्यार्थी सांभाळताना शिक्षकांची दमछाक
वाशिम : इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर शाळांनी दिलेल्या नियमांचे विद्यार्थ्यांकडून पालन केले जाते का, यासंदर्भात शिक्षकांशी चर्चा केली असता पाचवी व सहावीची मुले लहान असल्याने त्यांना सांभाळताना माेठी दमछाक हाेत असल्याचे पुढे आले.
शाळेत येताना विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा न आणण्याचे अनेक शाळांनी सांगितले आहे. इयत्ता पाचवी, सहावीचे विद्यार्थी भूक लागल्याचे सांगत आहेत. तर काही विद्यार्थी ताेंडाचा मास्क वेळाेवेळी काढून टाकताहेत. त्यांना वारंवार सूचना केल्यानंतरही विविध कारणे सांगितली जात आहेत. अनेक महिन्यांपासून मित्र मिळाले नसल्याने वेळाेवेळी एकमेकांजवळ जाऊन बसण्याचा हट्टसुध्दा मुलांकडून हाेत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.
.............
विद्यार्थी यांना पाळावयाचे नियम
इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत येताना प्रत्येक विद्यार्थ्याने मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर साेबत आणावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. हे इयत्ता पाचवी, सहावीच्या विद्यार्थी यांच्याकडून करून घेताना शिक्षकांना माेठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थी वेळाेवेळी मास्क काढून टाकत असल्याचे चित्र आहे.
.........
मास्क लावण्याचा कंटाळा
शाळा सुरु झाल्यात, विद्यार्थीही शाळेमध्ये येत आहेत. इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थी यांचे वय कमी असल्याने ते जीव गुदमरताेय, असे कारण सांगून मास्क लावण्याचा कंटाळा करत आहेत. त्यांना वारंवार सूचना देऊन मास्क लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
सुमित मिटकरी, शिक्षक, विद्याभारती स्कूल, वाशिम
..........
मित्राजवळ बसायचा हट्ट
माेठ्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी भेटीगाठी झाल्या आहेत. काेराेना संसर्ग पाहता शाळेकडून विद्यार्थी यांच्यामध्ये अंतर ठेवून बसविण्यात येत आहे. परंतु विद्यार्थी मित्राजवळ बसायचा हट्ट करीत आहेत. यावेळी त्यांना समजावून सांगताना माेठी कसरत हाेत आहे.
नारायण वाघ, शिक्षक, शिवाजी हायस्कूल, वाशिम
............
विद्यार्थी नियमांचे करताहेत पालन
विद्यार्थ्यांना शाळेत पाठविताना पालकांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. तसेच शाळेत पाठविताना काय करावे व काय करू नये, याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी यांनासुध्दा सांगितल्यानंतर त्यांच्याकडून नियमांचे पालन केले जात आहे.
अभिजित जाेशी, शिक्षक, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल
...........
एकूण शाळा ८०६
विद्यार्थी संख्या ८१५१८
शिक्षक संख्या ३९०१