तूर चोरटा जेरबंद

By Admin | Updated: February 4, 2017 01:44 IST2017-02-04T01:44:04+5:302017-02-04T01:44:04+5:30

कारंजा पोलिसांची कारवाई.

Tire Chorta Jerband | तूर चोरटा जेरबंद

तूर चोरटा जेरबंद

कारंजा, दि. 0३- तूर चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराला जेरबंद करण्यात कारंजा पोलिसांना यश आले. २ फेब्रुवारी रोजी मूर्तिजापूर येथून अब्दुल रईस अब्दुल शहीद यास अटक केली.
कारंजा ते पोहा रोडवरील मनिष साबू यांच्या मालकीच्या गोडावूनमधून तूरीचे २५ पोते लंपास झाले होते, अशी तक्रार गिरीष संगवी यांनी २0 जुलै २0१६ रोजी कारंजा पोलिसात दिली होती. याप्रकरणी यापूर्वी छोट्या लल्लू पप्पुवाले, ईब्राहीम उर्फ करिजमा छोटू पप्पुवाले, फिरोजा खान जेसीमा खान कारंजा यांना अटक केली होती. ते सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अब्दुल रईस अब्दुल शहीद हा फरार होता. अखेर त्यास २ फेब्रुवारीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. गुन्हय़ात वापरलेले वाहन, ७ नग तुरीचे पोते जप्त केले. कारंजा पोलीस चमूने कामगिरी बजावली. आरोपीस तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.

Web Title: Tire Chorta Jerband