रामनवमीच्या शोभायात्रेत चिमुकल्यांच्या कसरती
By Admin | Updated: April 4, 2017 18:58 IST2017-04-04T18:58:47+5:302017-04-04T18:58:47+5:30
शोभायात्रेमध्ये व्यायाम शाळेच्यावतीने चिमुकल्यांच्या मल्लखांबावरील कसरती सादर करण्यात आल्या.

रामनवमीच्या शोभायात्रेत चिमुकल्यांच्या कसरती
वाशिम: प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त वाशिम येथे मंगळवारी शहरातून हिंदू बांधवांच्यावतीने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरून ही मिरवणूक फिरविण्यात आली. या शोभायात्रेत विविध मंडळांनी सहभाग घेतला. ठिकठिकाणी प्रभू श्रीराम चंद्रांची पुजाही करण्यात आली. या शोभायात्रेमध्ये व्यायाम शाळेच्यावतीने चिमुकल्यांच्या मल्लखांबावरील कसरती सादर करण्यात आल्या. स्थानिक शिवाजी चौकात एका १० वर्षीय चिमुकल्याने मल्लखांबावर केलेल्या कसरतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वाशिम शहरात विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांसह समस्त हिंदू बांधवांच्यावतीने रामनवमीच्या दिवशी दरवर्षी भव्य शोभायात्रा काढण्यात येते. ही परंपरा यंदाही कायम ठेवत वाजतगाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.