शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

एसटीच्या तिकिट मशीन ठरताहेत डोकेदुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 15:42 IST

मशीनमध्ये वारंवार बिघाड होण्यासोबतच या मशीन लवकरच डिश्चार्ज होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील चारही आगारांत वाहकांसाठी उपलब्ध केलेल्या तिकिट मशीन डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. मशीनमध्ये वारंवार बिघाड होण्यासोबतच या मशीन लवकरच डिश्चार्ज होत आहेत. त्यामुळे वाहकांना अडचणी येत आहेत. दरम्यान, अशा परिस्थिती पूर्वीच्या पद्धतीनुसार ट्रे वापरण्याबाबतही उदासीनता असल्याने बसफेºयांना विलंब होऊन प्रवाशांचे मात्र नाहक हाल होत आहेत.  एसटी महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या तिकीट मशीनमध्ये बिघाड झालेला असतानाही आणि त्यांची कालमर्यादा संपली असतानाही त्या वापरण्याची सक्‍ती वाहकांना करण्यात येत आहे.  एसटी महामंडळाच्या तब्बल १९ हजार बसेसच्या माध्यमातून महामंडळाला महिन्याकाठी कोट्यवधींचा महसूल मिळत आहे. त्यामुळेच हा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाने आठ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून ४५ हजार मशीन्स खरेदी केल्या आहेत. संबंधित कंपनीच्या सुचनेनुसार या मशीन्सची वयोमर्यादा पाच वर्षे आहे. मात्र, या मशीन्सची खरेदी करून आठ वर्षांहूनही अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे या मशीन्स बदलण्याची आवश्‍यकता होती. त्यासंदर्भात अनेक वाहकांनी प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत.  या मशीन्स अचानक बंद पडणे, त्यांचे चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकिट अर्धवट निघणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहक त्रस्तही झाले आहेत. तिकिट मशीनमधील बिघाड अथवा चार्जिंग उतरल्यानंतर वाहक गाडी पुढे नेत नाहीत. अनेकदा, तर आगारात चार्जिंग झालेल्या मशीनच उपलब्ध नसल्याने बस तासनतास उभी ठेवली जाते. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मंगरुळपीर आगारात मंगळवारी लांब पल्ल्यांच्या दोन बसफेºयांच्या वाहकांनाही चार्जिंग झालेली मशीन मिळत नसल्याने या फेºयांना विलंब झाला.

ट्रे वापराबाबत उदासीनताएसटी महामंडळाने वाहकांना तिकिटासाठी उपलब्ध करून दिलेल्या मशीन वारंवार बिघडत आहेत. त्याची चार्जिंग उतरत आहे. त्यामुळे वाहकांना अडचणी येत आहेतच शिवाय बसफेºया खोळंबत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशात वाहकांनी पूर्वीच्या ट्रे पद्धतीचा आधार हाताशी ठेवणे आवश्यक आहे. तसी सोयही आगारात करून ठेवलेली आहे; परंतु ट्रे वापराबाबत फारसा उत्साह दिसत नाही. यामुळे एक, तर वाहकांना नव्या मशीन उपलब्ध करणे किंवा त्यांना ट्रे सोबत ठेवण्याची सक्ती करण्याबाबत एसटी प्रशासनाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत प्रवासीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी