कारंजा अमरावती मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; टाकळी फाटया नजिकची घटना
By नंदकिशोर नारे | Updated: January 12, 2024 13:27 IST2024-01-12T13:27:01+5:302024-01-12T13:27:18+5:30
सुदैवाने जीवित हानी टळली

कारंजा अमरावती मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; टाकळी फाटया नजिकची घटना
वाशिम : कारंजा अमरावती मार्गावर शुक्रवार १२ जानेवारी राेजी पहाटे ४ वाजता बर्निग ट्रकचा थरार पाहायला मिळाला.
सोमनाथ सानप यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एम. एच.०५ ए. एम २९२२ मुंबईहून अमरावती येथे जात असताना टाकळी फाटयानजिक शॉर्ट सर्किटमुळे ट्रक ला आग लागली . या घटनेत ट्रक आणि ट्रकमधील माल जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. चालक अजय कुमार गौतम व क्लीनर यांनी समय सूचकता दाखवत ट्रकमधून खाली उडी घेतली आणि घटनेची माहिती कारंजा न.प.च्या अग्निशमन दलाला दिली.
त्यानुसार अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि काही वेळाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे अधिकारी बाथम , चालक रेवाळे , फायरमॅन आमद खान व शुभम झोपाटे यानी आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ट्रकमध्ये बर्थडे केक व लोखंडी चेअर्स असा लाखो रुपयाचा माल जळून खाक झाला. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले. धनज पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील यावेळी घटनास्थळी हजर होते .घटनेचा पुढील तपास धनज पोलीस करीत आहे.