पत्नीच्या मृत्यू प्रकरणी तीन वर्षाच्या कारवासाची शिक्षा
By Admin | Updated: August 9, 2014 22:41 IST2014-08-09T22:01:53+5:302014-08-09T22:41:39+5:30
शारिरीक व मानसिक त्रास देणार्या आरोपी पती

पत्नीच्या मृत्यू प्रकरणी तीन वर्षाच्या कारवासाची शिक्षा
वाशिम: माहेरहून पैसे आणण्याची मागणी करुन शारिरीक व मानसिक त्रास देणार्या आरोपी पती अमरदिपसिंह चौहान यास पत्नीच्या मृत्यू प्रकरणी तीन वर्षाच्या कारवासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.रा.सिकची यांनी दि.७ ऑगस्ट रोजी सुनावली.
रिसोड तालुक्यातील वाकद येथे २0 नोव्हेंबर २0१२ रोजी सदर घटना घडली होती. अमरदिपसिंह नारायणसिंह चौहान यांच्या सोबत राधा हिचे घटनेच्या पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. सुरुवातीला वर्षभर चांगली वागणुक दिल्यानंतर दुचाकी घेण्याकरिता, बांधकामाकरिता, हॉटेलमध्ये फ्रिज घेण्याकरिता, पैसे आणण्याची मागणी करुन वेळोवेळी आपली बहिण राधा हिचा पती अमरदिपसिह चौहान, सासरे नारायाण्सिंह चौहान व सासु आशाबाई चौहाण हे मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ करीत होते. त्यामुळे सासरच्या जाचाळा कंटाळून राधा हिने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. अशी फिर्याद मृतक राधाचा भाऊ गोपालसिंह सुर्यप्रकाशसिंह ठाकुर खामगाव यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते. तपास पूर्ण करुन आरोपी विरुध्द कलम ४९८ अ. ३0४, ब ३0६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने एकुण सात साक्षीदार तपासले साक्षी पुराव्या परिस्थितीजन्य पुरावा व दोन्ही पक्षाच्या युक्तीवाद एैकल्यानंतर न्यायाधिश सिकची यांनी आरोपी पती अमरदिपसिंह चौहान यास कलम ४९८ अ मध्ये तीन वष्रे सङ्म्रम कारावास तसेच मृतक राधा हिच्या नातेवाईकांना झालेल्या त्रासाबददल ५0 हजार रुपये देण्याचे आदेश दिला. या प्रकरणी सरकसार पक्षातर्फे सुरुवातीला अँड.राजाभाऊ देशमुख यांनी तर नंतर अँड.अरुण सरनाईक यांनी कामकाज चालविले.