शेलूबाजार चौकातील वाहतुकीचे तीनतेरा

By Admin | Updated: May 20, 2014 22:36 IST2014-05-20T22:18:52+5:302014-05-20T22:36:13+5:30

वाहतुकीच्या कोंडीतून शेलुबाजार चौक अद्यापही बाहेर येऊ शकला नाही.

Three-way traffic in the Chelbaajaar Chowk | शेलूबाजार चौकातील वाहतुकीचे तीनतेरा

शेलूबाजार चौकातील वाहतुकीचे तीनतेरा

मंगरुळपीर: वाहतुकीच्या कोंडीतून शेलुबाजार चौक अद्यापही बाहेर येऊ शकला नाही. सुरळीत वाहतुकीसाठी नियुक्त केलेले कर्मचारीही चौकाऐवजी गावाबाहेरच खासगी प्रवासी वाहनं व अवजड वाहनांची तपासणी करण्यातच धन्यता मानत आहेत. अर्थात या सर्व घडोमोडी अर्थपूर्ण वाटाघाटीतून घडत असल्याचेही समोर येत आहे. एस टी च्या हक्काच्या जागेवर खुलेआम अतिक्रमन करणार्‍या वाहनाला अभय दिल्या जात असुन वाहतुक पोलीसांकडुन एस. टी. ला सावत्रपणाची वागणुक दिल्या जात आहे. एस टी महामंडळांने पोलीसांना निवेदन देवुन अवैध वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली आहे तालुक्यातील शेलूबाजार चौक दिवसेंदिवस संवेदनशिल बनत चालला आहे वारंवार वाहतुकीच्या कोंडीत अडकणार्‍या चौकाला बाहेर काढण्यासाठी वाहतुक शिपाई कमी पडत असल्याचे दिसून येते. चौकाऐवजी गावाबाहेर रस्त्यावर तपासणी होत असल्याने दिवसभर या चौकात वाहतुकीचा खेळखंडोबा पाहावयास मिळत आहे. वारंवार जाम होणार्‍या वाहतुकीमुळे आम आदमी पार वैतागुन गेले आहे.प् ादचारी, मुले,मुली वाहतुकीच्या सुळसुळाटमुळे त्रस्त होवुन गेले आहे. अकोला,मालेगांव,कारंजा, मंगरूळपीर या मार्गावर मोठया प्रमाणात अतिक्रमन वाढल्यामुळे भर रस्त्यावर दुचाकी वाहने सोडुन बाजारकरू फिरत असतात वाहतुकीस अडथळा निर्मान करणार्‍या वाहनावर कोणत्याच प्रकारची कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थीत केल्या जात आहे. एका छोटयाशा चौकासाठी तीन शिपाई तैनात तरी सुध्दा वाहतुकीचा खेळखंडोबा का ? हा संशोधनाचा विषय आहे. गत दोनवर्षा पुर्वी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी चौकातील वाहनाचा बेशीस्तपणा पाहल्यानंतर पोलीसांना नो पार्कीग झोन निर्मान करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्या सुचनांचे पालन होतांना दिसत नाही. एस टी महामंडळाची हक्काची जागा वाहतुक पोलीसांनी खाजगी वाहतुकीकरिता राखीव ठेवल्याचे चित्र पहावयास मिळते. कारण एस टी थांब्याचे ठिकाणी बस थांबली तर त्यांना तेथून बस त्वरीत काढण्याचे फर्मान कर्तव्यावर असणारे शिपाई सोडतात. शेलूबाजार येथे बुधवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्यांने दिवसभर तीनही शिपाई कर्तव्यावर असणे आवश्यक आहे. मात्र वसुलीचा दिवस असल्यामुळे चौकाला वार्‍यावर सोडुन अकोला, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव रोडवर ड्युटी बजावतांना दिसतात. सकाळी ८ वाजता चौकात कर्तव्यावर येण्याच्या ठाणेदारांच्या सुचना असतांनाही उशीरा येणे, लवकरच घरचा रस्ता धरण्याच्या प्रकारामुळे चौकातील बाजारकरू नागरिक, महिला असुरक्षीत झाले आहेत. मागील आठवड्यात लग्न सराई असल्याने सकाळी १0 ते १२ वाजताचे सुमारास दोन ते अडीच तास वाहतुक जाम झाली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. वरिष्ठानी याची दखल घेत एका शिपायाला ठाण्यात बोलवुन घेतले होते. पुढे काय झाले हे मात्र गुलदस्त्यात आहे. विस्कळीत वाहतुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

Web Title: Three-way traffic in the Chelbaajaar Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.