अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी
By Admin | Updated: May 17, 2014 00:12 IST2014-05-17T00:12:01+5:302014-05-17T00:12:26+5:30
ट्रक व मोटार सायकलचा अपघात होवून यामध्ये मालेगाव येथील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी
मालेगाव : वाशिम महामार्गावरील हॉटेल जलधाराजवळ १५ मे रोजी रात्री ११.३0 वाजता ट्रक व मोटार सायकलचा अपघात होवून यामध्ये मालेगाव येथील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. वाशिम येथून आपले कर्तव्य बजावून मोटारसायकलने घरी जात असताना अचानक मागून एम.एच. झोड १५0८ या क्रमांकाच्या ट्रकने एम.एच. ३७- डी ५५१९ या दुचाकीस ओव्हरटेक करीत असताना गाडीवरील ताबा सुटला व ट्रक झाडावर जावून आदळला. यावेळी ट्रक मागेच येत असलेली दुचाकी चालक घाबरला व त्याने ट्रकच्या मागील बाजुला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार सोनु यादव, रवी जवंजाळ, विशाल कष्टे हे तिन पोलीस जखमी झाले. ट्रक चालक फरार असून वृत्त लिहिस्तोर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.