रिसोड तालुक्यात तीन ठिकाणी चो-या

By Admin | Updated: September 30, 2014 01:34 IST2014-09-30T01:34:38+5:302014-09-30T01:34:38+5:30

लाखोंचा ऐवज लंपास.

Three places in Raisud taluka | रिसोड तालुक्यात तीन ठिकाणी चो-या

रिसोड तालुक्यात तीन ठिकाणी चो-या

रिसोड : तालुक्यातील दोन गावांमध्ये २८ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान व एका गावात २९ रोजी दुपारच्या सुमारास चोरीच्या घटना घडल्या आहेत. मोठेगाव येथे भरदिवसा १ लाख ७५ हजारांची चोरीची घटना २९ ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली असून, तसेच ग्राम करडा व उकीरखेड येथे ही २८ व २९ च्या रात्रीदरम्यान चोरीच्या घटना घडल्या आहे. रिसोड येथील किराणा व्यावसायिक संजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्व त:च्या घरातील कानातील सोन्याची फुले ४ ग्रॅम, चांदीचे भांडे, नगदी २0 हजार रुपये तसेच किसनराव देशमुख यांच्या घरातील कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचा चपळाहार ३0 ग्रॅम, सोन्याच्या अंगठय़ा १५ ग्रॅम चांदीचे भांडे, चेन व १५ हजार रुपये व शेजारच्या गजानन तायडे यांच्या घरातील मागील दरवाजा उघडून नगदी २ हजार असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. तपासाच्या दृष्टीने श्‍वानपथक बोलाविण्यात आले होते. तसेच करडा येथे आनंदराव देशमुख यांच्या घरातील कपाटामधून नगदी २ हजार ५00 रुपये २८ च्या रात्री लंपास केले. घरी कोणी नसताना चोरीचा प्रकार घडला आहे. उकीरखेडा येथे खिडकीची कडी वाकवून बाजीराव आवले यांच्या सुनेच्या गळय़ातील सोन्याची पोथ तोडण्याचा प्रयत्न केला असून, घरातील २ हजार किमतीचा टीव्ही केबलचा एम्प्लिफायर लंपास केला. या प्रकरणी कलम ४५४, ३८0 अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three places in Raisud taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.