कार दुचाकी अपघातात तीन जण जखमी
By Admin | Updated: March 22, 2016 02:23 IST2016-03-22T02:23:55+5:302016-03-22T02:23:55+5:30
नागपूर-औरंगाबाद मार्गावरील घटना

कार दुचाकी अपघातात तीन जण जखमी
शेलूबाजार: मालेगावकडून शेलूबाजारकडे येणार्या दोन दुचाकींना विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीने धडक दिल्याने दोन्ही दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २१ मार्च रोजी दुपारी ४:३0 वाजताच्या सुमारास घडली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास सोनाळा येथील माजी पं. स सदस्य किशोर शंकरराव अवगण आपल्या एम.एच. ३७ ई १३२४ या दुचाकीने शेलूबाजारकडे येत होते. सोबतच कोठारी व एरंडा येथील निरंजन सातपुते व गजानन पांडे हे एम.एच.३0 सी ८९५९ या दुचाकीने येत असताना शेलूबाजारवरून मालेगावच्या दिशेने सुसाट वेगाने जाणार्या एम.एच.३0 पी २६0६ या कारसमोरून येणार्या दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी अकोला रवाना करण्यात आले असून, तेथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.