पिंप्री मोडक येथे आणखी तीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:18+5:302021-05-29T04:30:18+5:30
देयक वसुलीची मोहीम प्रभावित वाशिम : अनेक ग्राहकांकडे विद्युत देयकांची लाखो रुपयांची रक्कम थकीत आहे. ती वसूल करण्याची मोहीम ...

पिंप्री मोडक येथे आणखी तीन रुग्ण
देयक वसुलीची मोहीम प्रभावित
वाशिम : अनेक ग्राहकांकडे विद्युत देयकांची लाखो रुपयांची रक्कम थकीत आहे. ती वसूल करण्याची मोहीम ‘महावितरण’कडून हाती घेण्यात आली होती; परंतू, सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मोहीम प्रभावित होत आहे.
रेती वाहतूकप्रकरणी कारवाईच नाही
वाशिम : जिल्ह्याबाहेरील वाहनांमधून रिसोड-वाशिम या मार्गावरून रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असून अशा वाहनांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
विहीर अधिग्रहणाबाबत चाचणी
वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाईची चाहूल लागली असून, पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी पंचायत समिती चमूतर्फे चाचणी केली जात असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शुक्रवार स्पष्ट केले.
कोरोना लसीकरण मोहीम ठप्प
वाशिम : लसीचा साठा संपल्याने रिसोड तालुक्यात लसीकरण मोहीम ठप्प पडली आहे. लसीचे डोस केव्हा मिळणार याकडे नागरिकांची लक्ष लागून आहे. मागणीच्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम वारंवार प्रभावित होते.
विहीर अधिग्रहण करण्याची मागणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात पाणीटंचाईचे सावट असून, संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी विहीर अधिग्रहण करण्यात यावे किंवा नळ योजना अंमलात आणावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.