महिलेच्या पर्समधून तीन लाखांचे दागिने लंपास

By Admin | Updated: May 29, 2017 01:21 IST2017-05-29T01:21:47+5:302017-05-29T01:21:47+5:30

रिसोड : स्थानिक बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

Three lakh jewelery lamps from woman purse | महिलेच्या पर्समधून तीन लाखांचे दागिने लंपास

महिलेच्या पर्समधून तीन लाखांचे दागिने लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : स्थानिक बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधून तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत स्वाती बेंडगुले (रा.जिंतूर, जि.परभणी) यांनी रिसोड पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की भावाच्या लग्नासाठी रिठद येथे जाण्याकरिता रिसोड ते वाशिम बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने पर्समधील सोन्याचा नेकलेस, कानातले, नाकातले, गंठन, तीन सोन्याच्या अंगठ्या, असा एकूण तीन लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three lakh jewelery lamps from woman purse