Three killed in Akola-Pathur road accident | अकोला-पातूर रस्त्यावरील अपघातात जिल्ह्यातील तीन ठार

अकोला-पातूर रस्त्यावरील अपघातात जिल्ह्यातील तीन ठार

प्राप्त माहितीनुसार, अकोला-पातूर मार्गाने प्रवासी वाहन क्र.(एमएच ३७ ५३८१) प्रवासी घेऊन पातूरकडे येत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक (एमएच३० एल २९९६)ने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, प्रवासी वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमीमध्ये गायत्री ज्ञानेश्वर वंजारे या ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच चिखलगाववासीयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रवाना करण्यासाठी मदत केली. अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती होताच पातूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Three killed in Akola-Pathur road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.