वाशिम जिल्ह्यात तीन शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 20:14 IST2017-08-17T20:13:08+5:302017-08-17T20:14:19+5:30

वाशिम :गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिके सुकत आहेत. दरम्यान, सोयाबीन पीक करपून गेल्याने एका शेतकºयाने तर कर्ज व नापिकीला कंटाळून दोन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचा प्रकार गुरूवारी समोर आला.

Three farmers died in Washim district! | वाशिम जिल्ह्यात तीन शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला !

वाशिम जिल्ह्यात तीन शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला !

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाचे सावट हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिके कोमेजली

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिके सुकत आहेत. दरम्यान, सोयाबीन पीक करपून गेल्याने एका शेतक-याने तर कर्ज व नापिकीला कंटाळून दोन शेतक-यांनी मृत्यूला कवटाळल्याचा प्रकार गुरूवारी समोर आला.
जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून त्यापैकी यावर्षी ४ लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपातील विविध पिकांची पेरणी झाली. गत महिनाभरापासून पावसाचा थेंबही नसल्याने पिके सुकत चालल्याचे दिसून येते. हलक्या दर्जाच्या जमिनीवरील पिक परिस्थिती भयावह आहे. सोयाबीनच्या एकरी उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता किनखेडा येथील पंजाबराव अवचार या शेतकºयांनी व्यक्त केली. ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब असल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. पावसाअभावी सुकत चालेली पिके पाहून हताश झालेल्या तीन शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या घटना जिल्ह्यात १७ आॅगस्ट रोजी उघडकीस आल्या.
वाशिम तालुक्यात १७ आॅगस्ट रोजी दोन शेतकºयांनी याच कारणामुळे मृत्यूला कवटाळले. यामध्ये  तोंडगाव येथील दत्ता शालिकराम गोटे या शेतकºयाने शेतातील सोयाबीन  पिक वाळल्यामुळे शेतशिवारात विषारी औषध प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची फिर्याद मृतक दत्ता गोटे यांचे बंधु राम गोटे यांनी वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली.  सदर फिर्यादीत मृतक शेतकºयाकडे १७ गुंठे शेत असल्याचे नमुद आहे. त्याशिवाय  केकतउमरा येथील युवा शेतकरी अशोक किसन घोडे याने बँकेच्या कर्जापायी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.  सदर घटनेची फिर्याद गजानन किसनाजी घोडे यांनी वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. मृतक अशोक घोडे याने वडिलांच्या व काकांच्या नावाने संयुक्त शेतीवर ४० हजाराचे कर्ज काढले होते. गत २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने पीक सुकत चालल्याचे पाहून घोडे यांची चिंता वाढली होती. कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेतून त्यांनी विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमुद आहे. 
मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील रामभाऊ सवाईराम जाधव नामक शेतकºयाने नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना १७ आॅगस्टला उघडकीस आली. रामभाऊ जाधव यांचेकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. आताही पावसाने दडी मारल्याने ते चिंताग्रस्त होते. या चिंतेतून त्यांनी दाभा परिसरातील शेतशिवारात विषारी द्रव्य प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. जाधव यांच्याकडे ३० हजाराच्या वर बँकेचे कर्ज होते. यासंदर्भात आकाश जाधव यांनी फिर्याद दिल्याने मंगरूळपीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

Web Title: Three farmers died in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.