खंडणीबहाद्दराला तीन दिवसांची पोलीस कोठडी
By Admin | Updated: February 19, 2016 01:56 IST2016-02-19T01:56:56+5:302016-02-19T01:56:56+5:30
दोन आरोपीं पसार.

खंडणीबहाद्दराला तीन दिवसांची पोलीस कोठडी
वाशिम : महात्मा फुले मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहासंबंधी केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पैसे स्वीकारणार्या संजय वैरागडे याला १८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, माणिक बांगर व भानुदास खंडारे सध्या पसार झाले आहेत.
शहरातील अल्लडा प्लॉट परिसरात वसंत धाडवे यांचे महात्मा फुले मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात भानुदास खंडारे नामक इसमाने चार-पाच मुलांची दिशाभूल करून स्वत:च्या हस् ताक्षराने वसतिगृहातील गैरसोयींची तक्रार संबंधीत अधिकार्याकडे केली. या तक्रारीमध्ये वसतिगृहांतील मुलांना जेवन व्यवस्थित दिले जात नाही, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, अशा स्वरूपाचे मुद्दे हो ते. त्यानंतर खंडारे यांनी संजय वैरागडे व माणिक बांगर यांना बोलावून वसतिगृहाच्या विरोधात तक्रार दिली होती.
सदर तक्रार मागे घेण्याकरिता धाडवे यांना ३0 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले. स् थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १७ फेब्रुुवारी रोजी काटा मार्गावरील हॉटेलमध्ये सापळा रचला असता, संजय परशराम वैरागडे याने सात हजार रुपयांची खंडणी दोन पंचासमक्ष स्वीकारताच रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर वैरागडे याने सदर नोटा फाडून तोंडात टाकून गिळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संजय वैरागडे, माणिक बांगर व भानुदास खंडारे या तिघांविरुद्ध भादंविचे कलम ३८४ (खंडणी मागणे) व ३४ अन्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या वैरागडे याला १८ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी वैरागडेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.