आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:44 IST2021-05-11T04:44:09+5:302021-05-11T04:44:09+5:30
फिर्यादी सुशीला उददल चव्हाण (३०), रा. जोगलदरी यांनी १० मे रोजी तक्रार दिली की, पती उदल चव्हाण हे कैलास ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
फिर्यादी सुशीला उददल चव्हाण (३०), रा. जोगलदरी यांनी १० मे रोजी तक्रार दिली की, पती उदल चव्हाण हे कैलास राठोड यांच्याकडे कामावर मागील तीन दिवसांपासून जात होते. कैलास हे फिर्यादीच्या पतीला कामाचे पैसे देत नव्हते. त्यामुळे पती तणावात होते. कैलासने पैसे न दिल्यास मरणाशिवाय पर्याय नाही, असे पतीने म्हटल्याचे सुशीला चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले. ९ मे रोजी उदल चव्हाण यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पतीच्या मृत्यूस कैलास राठोड, कैलास राठोड यांचे साडू, रा. दाभा व गावातील सरदार विष्णू राठोड हे जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावरून तीन आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.