एकाच दिवशी तीन घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2015 02:21 IST2015-04-25T02:21:14+5:302015-04-25T02:21:14+5:30
मालेगावात दोन घरफोड्या; तर वडी येथे ५६ हजार लंपास.

एकाच दिवशी तीन घरफोड्या
मालेगाव (जि. वाशिम) : मालेगाव शहरात दोन तर तालुक्यातील वडी येथे एक अशा तीन घरफोड्या २४ एप्रिल रोजी घडल्या आहेत. यामध्ये जवळपास एक लाख ३१ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. मालेगाव : शहरातील वार्ड क्रमांक चारमधील सिद्धेश्वर कॉलनीमध्ये असलेल्या अशोक घुगे यांच्या निवासस्थानी २४ एप्रिलला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून घरात प्रवेश केला आणि सोन्याची अंगठी व नगदी रोकड असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची फिर्याद अशोक घुगे यांच्या मुलगा अभय घुगे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. २४ एप्रिल रोजी आई व वडील ११.३0 ते १२ वाजेदरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेले असता, या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कला आला. पुढील तपास पो.हे.काँ. मारोती भवाळ करीत आहेत. दुसर्या एका घटनेत शेलु फाटा रोडवरील संताजी नगरातील पवन देवराव काटेकर यांच्या घरी चोरी झाल्याची बाब सायंकाळी ६.३0 वाजता उघडकीस आली. पवन काटेकर लग्न समारंभ आटोपून सायंकाळच्या सुमारास घरी आले असता घराचे कुलूप फुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख असा एकूण ५२ हजाराचा ऐवज लंपास केला. काटेकर यांनी मालेगाव स्टेशनला रात्री ९ वाजतादरम्यान फिर्याद दिली आहे.