मिरवणूकवर दगडफेक प्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: April 16, 2017 20:07 IST2017-04-16T20:07:50+5:302017-04-16T20:07:50+5:30
वाशिम- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करणाºया तिघांना अटक करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार अंबुलकर यांनी दिली.

मिरवणूकवर दगडफेक प्रकरणी तिघांना अटक
वाशिम : डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकवर तिघांनी संगनमत करुन दगडफेक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. ग्रामीण पोलीसांनी तिनही आरोपिंना अटक केल्याची माहिती ठाणेदार सुनिल अंबूलकर यांनी दिली.
वाशिम तालुक्यातिल काटा या गावी दरवर्षी प्रमाणे यंदाही 14 एप्रिल रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. ही शोभायात्रा गावातील गोडाऊन पर्यंत पोहचली असता अज्ञात युवकांनी शोभायात्रेवर अचानक दगडंफेक केली. या दगडफेकीत कुणाल वसंता बन्सोड व राजू जाधव जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपिंचा शोध घेऊन त्यांना अटक केली. अटक केलेल्या आरोपीमधे रामदास भगवान अंभोरे, पवन उर्फ प्रतिक किसन देशमुख व पप्पू विनायकराव देशमुख यांचा समावेश आहे. या तिनही आरोपी विरुध्द भादंवी 336, 337, 34 व अँट्रासिटी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.