चोरी प्रकरणात तिघांना अटक
By Admin | Updated: September 22, 2016 01:18 IST2016-09-22T01:18:45+5:302016-09-22T01:18:45+5:30
मेडशी येथील चोरीच्या प्रयत्नातील तीन चोर जेरबंद.

चोरी प्रकरणात तिघांना अटक
मालेगाव(जि. वाशिम), दि. २१- तालुक्यातील मेडशी येथील नागनाथ महादेव संस्थान येथे १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. या घटनेतील चोरट्यांना पकडण्यासाठी मालेगाव आणि मेडशी येथील पोलीस प्रशासनाने जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली आणि पातूर येथून बुधवारी तीन जणांना पकडून आणले. नागनाथ महादेव संस्थान येथे चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी चोरट्यांना पकडण्यासाठी मेडशी चौकीवर एकच गर्दी केली होती. मंगळवारी शे. रहेमान ऊर्फ भुर्या तर बुधवारी शे. हसन , शेरखाँ सुभान खाँ यांना पातूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७९, ५११, ३३६, २९५, ३४३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.