जीवे मारण्याची धमकी; चौघांविरुध्द गुन्हा दाखल!
By Admin | Updated: July 17, 2017 13:48 IST2017-07-17T13:48:23+5:302017-07-17T13:48:23+5:30
वाशिम शहर पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.

जीवे मारण्याची धमकी; चौघांविरुध्द गुन्हा दाखल!
वाशिम : घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
स्थानिक लाखाळा परिसरातील प्रोफेसर कॉलनीस्थित सारडा कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या विरेंद्र हरिदास देवाणी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की आरोपी गोविंद सुरेश तापडिया (रा.शुक्रवारपेठ, वाशिम) यांच्यासह स्वप्निल दिलीप मनवार, गणेश बंडूसिंग राठोड (दोघेही रा.हिंगणा रोड नागपूर) आणि सचिन रामलाल पेंढारकर (रा.मंगरुळपीर) या चौघांनी संगणमत करुन आपणास जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून नमूद चारही आरोपींविरूद्ध वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये कलम ३४२, ४५१, ५०६, ३४ भादंविअन्वये गुन्हे दाखल करण्यात आला.