घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: July 17, 2017 02:40 IST2017-07-17T02:40:15+5:302017-07-17T02:40:15+5:30

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

The threat of intruding into the house | घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

घरात घुसून जीवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहर पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध रविवारी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.
स्थानिक लाखाळा परिसरातील प्रोफेसर कॉलनीस्थित सारडा कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या विरेंद्र हरिदास देवाणी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की आरोपी गोविंद सुरेश तापडिया (रा.शुक्रवारपेठ, वाशिम) यांच्यासह स्वप्निल दिलीप मनवार, गणेश बंडूसिंग राठोड (दोघेही रा.हिंगणा रोड नागपूर) आणि सचिन रामलाल पेंढारकर (रा.मंगरुळपीर) या चौघांनी संगणमत करुन आपणास जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरून नमूद चारही आरोपींविरूद्ध वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये कलम ३४२, ४५१, ५०६, ३४ भादंविअन्वये गुन्हे दाखल केले.

Web Title: The threat of intruding into the house