पाझर तलावातून हजारो लीटर पाण्याची नासाडी

By Admin | Updated: May 19, 2014 01:14 IST2014-05-19T01:01:16+5:302014-05-19T01:14:42+5:30

वाशिम जिल्ह्यातील बागापूर पाझर तलावाचा व्हाँल्व नादुरूस्त झाल्याने पाण्याची नासाडी होत आहे.

Thousands of liters of water waste from the percolation tank | पाझर तलावातून हजारो लीटर पाण्याची नासाडी

पाझर तलावातून हजारो लीटर पाण्याची नासाडी

उंबर्डाबाजार : बागापूर पाझर तलावाचा शेतीसाठी पाण्याचा पुरवठा व्हाँल्व गेल्या काही महिन्यापासून नादुरूस्त झाल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असताना लघुसिंचन विभागाच्या अधिकार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. उन्हाळयाच्या दिवसात पाण्याचे योग्य नियोजन व्हावे याकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत आराखडे तयार करून पाण्याची बचत कशी करता येईल याची योजना आखत असताना लघुसिंचन विभागाच्या अधिकार्‍यांच्या कामचुकारपणामुळे त्यांचे बागापूर पाझर तलावाच्या पाणी व्यवस्थापनाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बागापूर पाझर तलावाचा व्हॉल्व नादुरूस्त असल्याने मोठय़ा प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. तसेच पाणी वाहून नेणारे कॅनालसुद्धा ठिकठिकाणी नादुरूस्त असताना केवळ बोगस बिले दाखवून पैसे उकडण्याचा गोरखधंदा सुरू असल्याने शासनाच्या पाणी अडवा, पाणी जिरवा या मुळे उद्देशाला तिलांजली देण्याचा प्रकार लघुसिंचन विभागाच्या वतीने सुरू असल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Thousands of liters of water waste from the percolation tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.